अनुभवातन्मक "गुरू" दक्षिणा...
आज " गुरू पौर्णिमा" म्हणूनच काही विशेष अनुभव सांगताना माझ्या आज वरच्या प्रत्येक "गुरू" ना मी नमन करतो. बालपण आणि आई-वडील पहिले " गुरू " आणि आयुष्य त्यांच्या नजरेतून पाहायला सुरुवात करताना, रांगत-रांगत पहिला हात पकडतो तो "मातृत्व" चा आई-बाबा कुठे आहे, असा प्रश्न एखादी व्यक्ती काका-मामा विचारते आणि ते बाळ कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत असते. शाळा एक आठवणीतील पाहिलं प्रेम चं. हो प्रेमचं, इथं आपल्याला शिक्षणाचे धडे शिकविणारे पाहिले "गुरू" मिळतात, आणि ते जो मार्ग दाखवतील त्यावर आपण निश्चिंतपणे चालायला लागतो. शाळेतील छोटे-छोटे अनुभव,चांगल्या-वाईट सवयी आणि आपल्याच "गुरू" नी आपल्याला दिलेला प्रसाद म्हणजेच " छडी लागे, छम-छम विद्या येई गम-गम " महाविद्यालयात जाताना अनुभवाची सुरुवात होयला चालू होते असं वाटतं, महाविद्यालय म्हणजे असे वळण जिथं विद्यार्थी धडपड करतात, चांगली पदवी मिळवण्यासाठी... आयुष्यात खरं " वळण " तेव्हा येते जेव्हा आता शाळा-महाविद्यालय हे दोन पर्व संपवून आपण आपल्या खऱ्या आयुष्यात जन्म घ...